Home Breaking News बोरगडी ग्रामपंचायतला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे,यांच्या जयंतीचा व लोकमान्य टिळक पुण्यतिथी...

बोरगडी ग्रामपंचायतला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे,यांच्या जयंतीचा व लोकमान्य टिळक पुण्यतिथी यांचा विसर……

सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला नागरिक त्रस्त

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी,
कृष्णा राठोड ९१४५०४३३८१

हिमायतनगर:-
तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे समाज सुधारक,कवी, साहित्यकार, प्रबोधनकार, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्रणी लढा देणारे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच”
अशी सिंह गर्जना करणारे व पत्रकार, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता, स्वातंत्र्य सेनानी,शिक्षक,
वकिल, भारतीय क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच यांच्या पुण्यतिथी चा विसर बोरगडी येथील सरपंच, ग्रामसेकास होता,
महाराष्ट्र शासन २०२२ च्या परिपत्रकानुसार राष्ट्र पुरुष,थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याचा सक्त आदेश बंधनकारक असताना सुध्दा बोरगडी ग्राम पंचायत चे सरपंच, ग्रामसेवक यांना प्रत्येक जंयतीचा विसर असतो, त्यांना आमच्या प्रतिनिधीने जयंती विषयी विचारले असता,आज काय आहे,कोणाची जयंती आहे,मला यातले काही माहिती नाही व ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमा नाहीत.तुम्हीच आम्हाला जयंती साजरी करण्यासाठी आठवण करून देत रहा,व नेत्यांच्या प्रतिमा घेवुन द्या अशी उडवाउडवीची उत्तरे आमच्या प्रतिनिधींना मिळाले.
लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रतिनिधी स अशी उत्तरे देत आहे तर सामान्य जनतेचे. काय हाल असतील असा प्रश्न उपस्थित सुजाण नागरिकांना होत आहे.
या अशा उद्धट कर्मचाऱ्यांवर यांच्या वरिष्ठांचे लक्ष नाही का.असे कर्मचारी फक्त पगार उचलण्यापुरतेच काम करतात का.असा सवाल सामान्य सुजाण नागरिकांमधुन ऐकायला मिळत आहे.
या विषयांची वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, संबंधीत तालुक्याचे गटविकास अधिकारी मयूर आनंदिलवाढ यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.संबधीत वरीष्ठ अधिकारी साहेबांनी चौकशी करून कारवाई करतील का असा सवाल सामान्य सुजाण नागरिक उपस्थित होत आहे.

Previous articleसाहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी..
Next articleमनसे कामगार संघटनेच्या वतीने प्रसाद वाटप