Home Breaking News परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

परभणी, (आनंद ढोणे) :- आगामी पंचवार्षिक निवडणूकीच्या आनूषंगाने जिल्ह्याच्या ९ तालूक्यातील एकूण ६० जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण हे तारीख २८ जूलै २०२२ रोजी जिल्हा परिषद गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत तर सर्व सर्व पंचायत समिती गणाचे ज्या त्या तालूक्याच्या तहसील कार्यालयात सबंधित तहसीलदार यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात येवून ते जाहीर करण्यात आले आहे.या पूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय सदर निवडणूका घेण्यात येणार होत्या. परंतु विद्यमान सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण पूर्वरत लागू करण्यात आले. त्यामुळे ओबीसी (नागरीकांचा मागास प्रवर्ग) सहीत निवडणूका घेण्याचा आनूषंगाने ओबीसी प्रवर्ग समाविष्ट करुन आरक्षण घोषित करण्यात आले. यात जिल्ह्यातील तालुकानिहाय जि प गटाचे आरक्षण काढण्यात आले आहे. परभणी तालूका:-१) झरी गट (नागरीकांचा मागास प्रवर्ग)२) बोबडे टाकळी (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) ३) असोला (सर्वसाधारण महिला) ४) कुंभकर्ण टाकळी (सर्वसाधारण महिला) ५) पेडगाव (सर्वसाधारण) ६) जांब (आनूसुचित जाती) ७) सिंगणापूर (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) ८) पिंगळी (सर्वसाधारण महिला) ९) लोहगाव ( आनूसुचित महिला) १०) पोखर्णी (सर्वसाधारण महिला) ११) दैठणा (सर्वसाधारण) पूर्णा तालूका:- १) चुडावा (सर्वसाधारण महिला) २) एरंडेश्वर (सर्वसाधारण महिला) ३) गौर (सर्वसाधारण) ४) ताडकळस (सर्वसाधारण) ५) कावलगाव (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) ६) कानडखेड (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) ७) वझूर (नागरीकांचा मागास प्रवर्ग) गंगाखेड तालूका:-१) धारासूर (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) २) महातपूरी (आनूसुचित जाती महिला) ३) मरडसगाव (नागरीकांचा मागास प्रवर्ग) ४) ईसाद(आनूसुचित जाती) ५) गुंजेगाव (सर्वसाधारण) ६) कोद्री (सर्वसाधारण) ७) राणीसावरगाव (सर्वसाधारण महिला). जिंतूर तालूका:-१) वाघी धानोरा (आनूसुचित जाती) २) वझर बु. (सर्वसाधारण) ३) म्हाळसा सावंगी (सर्वसाधारण महिला) ४) भोगाव ( आनूसुचित जाती महिला) ५) आडगाव बाजार (सर्वसाधारण महिला) ६) वरुड ( आनूसुचित जाती महिला) ७) पुंगळा (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) ८) बोरी (आनूसुचित जाती) ९) चारठाणा (सर्वसाधारण) १०) कौसडी (सर्वसाधारण) ११) वस्सा (नागरीकांचा मागास प्रवर्ग). सेलू तालूका:-१) वालूर (सर्वसाधारण महिला) २) चिखलठाणा (नागरीकांचा मागास प्रवर्ग) ३) कुपटा (सर्वसाधारण) ४) हादगाव खु. (सर्वसाधारण महिला) ५) देवूळगाव गात (सर्वसाधारण महिला) ६) रवळगाव (सर्वसाधारण महिला) . मानवत तालूका:-१) ताडबोरगाव (सर्वसाधारण) २) कोल्हा (सर्वसाधारण) ३) केकरजवळा (सर्वसाधारण महिला) ४) रामापूर बु. (नागरीकांचा मागास प्रवर्ग). सोनपेठ तालूका:-१) नरवाडी (नागरीकांचा मागास प्रवर्ग) २) शेळगांव महाविष्णू (सर्वसाधारण) ३)उखळी बुद्रुक (सर्वसाधारण महिला) ४) डिघोळ (सर्वसाधारण महिला). पाथरी तालूका:-१) देवनांद्रा (सर्वसाधारण) २) हादगाव बुद्रुक (सर्वसाधारण) ३) बाभळगाव (सर्वसाधारण) ४) कासापूरी ( जाती महिला) ५) लिंबा (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला). पालम तालूका:-१) पेठशिवणी (सर्वसाधारण महिला) २) रावराजूर (सर्वसाधारण) ३) चाटोरी (नागरीकांचा मागास प्रवर्ग) ४) पेठपिंपळगाव (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) ५) बनवस ( आनूसुचित जाती). याप्रमाणे आरक्षण सोडत ही लहान मुलांच्या हस्ते चिट्ठी काढून जाहीर करण्यात आले आहे.दरम्यान सदर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या त्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षाचे व काही अपक्ष ईच्छूक स्थानिक नेते मंडळी आता कामाला लागणार असून काही जणांचा मात्र आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे. ज्या काही सर्वसाधारण नेत्यांना ज्या गटातून निवडणूक लढवायची होती ते गट ईतर समाजातील प्रवर्गाकरीता आरक्षित झाल्याने त्यांची मोठी पंचायत झाली आहे. शिवाय, जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय समजल्या जात असल्यामुळे परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक गटात पैशाची उधळण होत असते. त्यामुळे येथे पैसेवालाच उमेदवार रेसमध्ये येवू शकते. असी परिस्थिती नेहमीचीच आहे.

Previous articleनाशिक महानगरपालिकेतील ओबीसी आरक्षणाची सोडत आज काढणार
Next articleशहरात मोकाट जनावरांचा वाहनधारकांना त्रास. बंदोबस्त करावा नागरीकांची मागणी.