हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
नाशिक महानगरपालिकेच्या तब्बल दिड़ वर्षापासून घोळत असलेल्या यापूर्वीच्या सोडतीत बदल करुन आता ओबीसी आरक्षण काढताना सर्वसाधारण महिलासाठीही आरक्षण ठरविण्या करीता शुक्रवार ( दि.29) रोजी महानगर पालिक़ेच्य महाकवी कालिदास कलामंदिर मध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे.
ओबीसी च्या 35 तर सर्वसाधारण महिला गटासाठीही 35 जागाचीच सोडत काढण्यात येणार आहे. महानगर पालिक़ेचे कमिश्नर डॉ. चंद्रकांत पुलकुडवार यांच्या उपस्थित ही सोडत काढण्यात येणार असून त्यासाठीची रंगीत तालीम ही यशस्वी करुन पाहण्यात आली आहे.
133 जागा पैकी अनुसूचित जाती जमाती साठी 29 जागाच्या सोडती अगोदरच काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकचा मागास प्रवर्ग ( ओबीसी ) साठी उर्वरित 104 जागामधून ही सोडत काढण्यात येणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्य एकून जागा पैकी 27% म्हणजेच 35 जागा ओबीसी साठी राखीव असणार आहेत. त्यामुळे सर्वप्रथम 104 मधून 35 चिट्ठया काढून ओबीसी आरक्षण निश्चित होईल. याच आरक्षित जागामधून 18 जागा ओबीसी महिला म्हणून सोडत काढून नक्की करण्यात येणार आहेत.
प्रतिक्रिया -:
निवडणुक आयोगाने अधिसूचित न केलेल्या व भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडनुकी करीता ओबीसी करीता 27% आरक्षण मिळणार असले तरी ते 50% पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय केल्या सारखं आहे.
तरी लोकसंख्याच्या वाढीव प्रमाणात अधिकचे ओबीसी आरक्षण लागू व्हावे ही ओबीसी ची न्याय मागणी असून शासनाने त्वरीत त्याबाबतीत पावले उचलावीत अन्यथा ओबीसीच्या प्रक्षुब्ध जनमताला शासनाला सा मोरे जावा लागेल.