श्याम बहुरूपे(तालुका (प्रतिनिधी)
बाळापूर-बाळापूर तालुक्यात सततधार पावसाने शेतकऱ्यांची जमीन खरडुन गेली तसेच शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यांची पाहणी बाळापूर मतदार संघाचे आमदार,नितीन देशमुख यांनी अधिकाऱ्यांसह आज पाहणी केली.
बाळापुर तालुक्यात गेल्या आठवडाभर झाले सततधार पावसाने शेतकऱ्यांचा पिकाचे अतोनात नुकसान झाले.काही शेतकऱ्यांचे पिक सुध्दा वाहुन गेले त्याची पाहणी बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज अधिकाऱ्यांसह पाहणी करुन शेतकऱ्यांचा झालेला नुकसानीचा तातडीने सर्व्है करुन शासनाकडे अहवाल पाठविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.यावेळी त्यांचासोबत उपविभागीय अधिकारी डाँ.रामेश्वर पुरी तहसिलदार सैय्यद एहसाद्दीन तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने यांचासह शिवसेना सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेळके पंचायत समिती सदस्य योगेश्वर वानखडे जनसेवक बबलु देशमुख ज्ञानेश्वर म्हैसने यांचासह शेतकरी उपस्थीत होते.