Home Breaking News पूर्णेतील “त्या” रेल्वे भुयारी पुलाखालच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याची

पूर्णेतील “त्या” रेल्वे भुयारी पुलाखालच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याची

भूमीराजा च्या वार्तांकनाची जिल्हाधिका-यांनी घेतली दखल

परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :-
पूर्णा शहरातील नांदेड कडे जाणाऱ्या लोहमार्गावर रेल्वे विभागाने भुयारी पूल बांधला आहे. त्या पुलाखाली ४ जुलै २०२२ रोजी रात्री पडलेल्या पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पुराचे स्वरुप आल्याने येथून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती.तसे तेथे अजूनही पाणी आहेच.
वाहन चालकांना तारेवरची कसरत करीत रस्ता मार्गक्रमण करावा लागतोय. या विषयी दि ५ जूलै २०२२ रोजी भूमीराजा न्यूज पोर्टलवर तात्काळ बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. भूमीराजा मधील त्या वार्तांकनाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दख्खल घेतली. त्या बरोबरच या प्रकाराची पूर्णेतील सर्व पत्रकार बांधवांनीही त्वरीत दख्खल घेत वार्तांकन करुन गैरसोयीची बातमी प्रसिद्ध करताच परभणीच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल ह्या दि ६ जुलै २०२२ रोजी पूर्णेत दाखल झाल्या आणि त्यांनी रेल्वे भुयारी पुलाखालच्या साचलेल्या पाण्याची पाहणी केली. तसेच सदरील पाणी नाली खोदल्यास कोण्या ठिकाणाहून निघून जाईल, या योग्य त्या उताराकडील भागाची देखील पाहणी करुन त्यानंतर नगरपरिषदेच्या कार्यालयात रेल्वे प्रशासन,सार्वजनिक बांधकाम, महसूल व नपच्या अधिका-यांची बैठक घेतली. तेथे हे साचलेले पाणी काढून देण्याची जबाबदारी ही नगरपरिषदेची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी नपचे मुख्याधिकारी अजय नरळे यांना धारेवर धरीत चांगलीच तंबी दिली तसेच तहसीलदार पल्लवी टेमकर यांचीही चांगलीच कान उघाडणी केली आणि सदरील साचलेले पाणी तात्काळ नाली खोदून काढून देण्याचे आदेश दिले.तद्नंतर, नगरपरिषद प्रशासन हादरुन लगेच उताराकडील दिशेने पाणी काढून देण्यासाठी पोकलॅनने खोदकाम चालू केले.शिवाय, त्यांनी पूर्णा शहरातील नादुरुस्त रस्ते, नाल्या, बिनापरवाना बांधण्यात आलेल्या घरांचीही पाहणी केली.

आणि पूर्णेतील घाणीने तुंबलेल्या नाल्या, नादुरुस्त रस्ते हे पाहून सबंधित प्रशासनाच्या अधिका-यावर नाराजी व्यक्त करुन नागरी सुविधांची आवश्यक कामे त्वरित करण्याचे आदेश दिले.या बरोबरच रस्त्या शेजारी ज्यांनी घरे बांधलेत त्यामुळे पाणी काढून देण्यासाठी त्या ठिकाणाहून नाली खोदण्यास अडचणी येत आहेत.त्या व्यतिरिक्त येथील रेल्वे लोहमार्गावर उड्डाण पुलाचे देखील काम चालू असल्याने पांगरा गावाकडून पूर्णेत येण्यासाठीचा पूर्वीचा रस्ता बंद केला आहे तो चालू करावा असी समस्या माजी सभापती प्रकाश ढोणे पाटील यांनी जिल्हाधिका-यास सांगितली त्यावरुन या संबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवते असे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी आंचल गोयल ह्या ६ जुलै २०२२ रोजी उशिरापर्यंत नगरपरिषद व तहसील येथे थांबून त्यांनी विविध समस्या पाहून जाणून घेत त्याचे निवारण तात्काळ करण्याचे आदेश सबंधित अधिका-यांना दिले. या प्रसंगी, जिल्हाधिकारी ह्या पुलाखाली साचलेल्या परिसर भागाची पाहणी करताना शहरातील असंख्य नागरीकांनी एकच गराडा घालून नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचा व भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवल्याचे उपस्थित नागरीकांनी सांगितले.

Previous articleपळसपुर येथे घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष…..
Next article१३ जुलै रोजी जिल्हा परिषद , पंचायत समितीचे आरक्षण सोडत होणार जाहीर…