Home Breaking News सोसायटी सचिवाची प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपतालुका प्रमुखास मारहाण

सोसायटी सचिवाची प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपतालुका प्रमुखास मारहाण

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळा लोखंडे शाखेतील घटना
परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) – नामदार बच्चूभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्णा उप तालुका प्रमुख बाभन ढोणे यांना परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा पिंपळा लोखंडे अंतर्गत असलेल्या पांगरा पूर्णा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव शितळे यांनी विनाकारण शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन मारहाण करुन अपमानित केले आहे. सदर घटना २८ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजता दरम्यान घडली आहे. प्रहार उपतालूका प्रमुख बाभन माणिकराव ढोणे हे दि २८ जून २०२२ रोजी अतिवृष्टी आनूदानाची २५ टक्के रक्कम आणण्यासाठी पिंपळा लोखंडे बॅंक शाखेत गेले होते. तेथे गावचे सेक्रेटरी शितळे हे हजर होते. त्यावेळी बाभन यांनी सचिवास आजोबाच्या नावे असलेले थकबाकी कर्ज रक्कम मयतानंतर सर्व मुलाच्या नावे टाकली का? असी विचारना केली असता दारुच्या नशेत तर्र.. असलेले सचिव यांनी अर्वाच भाषेत शिवीगाळ करुन दादागिरी करीत बाभन यास धक्काबुक्की चापट हाणून मारहाण करुन अपमानास्पद वागणूक दिली. त्यावरुन प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, नरेश जोगदंड, संजय वाघमारे, श्रीहरी इंगोले,रमेश जाधव,विठ्ठल बुचाले, संतोष नागठाणे, शेख मोईन या पदाधिका-यांनी दि २९ जून रोजी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे लोण अधिकारी यांच्या कडे पिंपळा लोखंडे येथील बॅंक कर्मचारी व सेक्रेटरी यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची तक्रार करण्यात आली आहे.त्वरीत कार्यवाही नाही केल्यास आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे. त्याच बरोबर सबंधित मुजोर सचिव यास कामावरुन निलंबित करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरीत आहे.

Previous articleमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गोरसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन…..
Next articleलाईनमनच्या हलगर्जीपणास जनता वैतागली