Home राजकारण नगरपंचायतीच्या मतदार यादीतील बोगस मतदार याद्यांची चौकशी करा..

नगरपंचायतीच्या मतदार यादीतील बोगस मतदार याद्यांची चौकशी करा..

अन्यथा आमरण उपोषण इशारा…!

हिमायतनगर | कृष्णा राठोड शहरात आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रं 1 ते 17 मधील सर्व प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ असल्याने मतदार यादीच्या अक्षेपावर दिनांक 27 जून रोजी हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अमेर सय्यद अहेमद यांच्यासह अनेकांनी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन वार्डात न राहणाऱ्या किंवा वास्तव्यास नसणाऱ्या अनेक मतदारांची नावे काही राजकीय लोकप्रतिनिधींच्या हितासाठी येथील मतदान यादीत समाविष्ट झाली आहेत, त्या मतदारांची तात्काळ चौकशी करून त्यांचे नावे वगळण्यात यावे.

bhumiraja news…..

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 21 जून 2022 ला विभागातर्फे हिमायतनगर शहरातील सार्वत्रिक नगरपंचायतीच्या वार्ड निहाय मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या दिनांक 27 जून रोजी त्यावर अक्षय घेण्याची शेवटची तारीख असल्याने हिमायतनगर शहरातील अनेक वार्डातील आजी-माजी नगरसेवकांनी या यादीत अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचे सांगितल्या. व अनेक वर्षापासून ज्या वार्डात मतदारांचे वास्तव्य आहे. त्याच वार्डात अनेक वर्षांपासून ते मतदान करीत आहेत त्याच वार्डात मतदारांची नावे असावीत असे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना सांगितले.

पण शहरातील काही माजी नगरसेवकांच्या स्वार्थासाठी नगर पंचायत च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरातील वार्ड क्रं 2 मध्ये इतर वार्डातील 70 मतदार , वार्ड क्रं 3 मध्ये इतर वार्डातील 250 मतदार,वार्ड क्रं.4 मध्ये इतर वार्डातील 50 मतदार,वार्ड क्रं.5 मध्ये इतर वार्डातील 100 मतदार , वार्ड क्रं.8 मध्ये इतर वार्डातील 30 मतदार, वार्ड क्रं.13 मध्ये 75 मतदार तर वार्ड क्रं.15 मध्ये इतर वार्डातील 72 बोगस मतदार टाकण्यात आले आहेत,

ह्या मतदारांचे वास्तव्य एका वार्डात आणि मतदार यादीत नाव दुसऱ्या वार्डात गेल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला त्यामुळे वार्डनिहाय समाविष्ट करण्यात आलेल्या याद्यावर अनेकांनी आक्षेप सुद्धा नोंदवून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती संबंधित नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा सामाजिक कार्यकर्ते सय्यद अमेर सय्यद अहेमद यांनी दिला आहे.

Previous articleहिमायतनगर पोलिसांनी वाचवले जखमी हरणाचे प्राण …….!
Next articleमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गोरसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन…..