Home कृषीजागर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचित!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचित!

परभणी, (आनंद ढोणे पाटील) – भाजपप्रणीत मोदी सरकारने १ फेब्रुवारी २०१९ पासून भारतातील सर्व शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी काही अंशी मदत व्हावी म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालू केली. या योजनेत नोंद करुन सहभागी झालेल्या पात्र शेतकऱ्यांना भारत सरकार कृषी मंत्रालयाच्या वतीने प्रति हप्ता २००० हजार रुपये या प्रमाणे वर्ष भरात एकूण ६०००/ हजार रुपये थेट बॅंक खात्यात वर्ग करण्यात येतात. आतापर्यंत ११ हप्त्यातून एकूण २२००० हजार रुपये सन्मान निधी मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. परंतु, काही शेतकरी या योजनेपासून अजूनही वंचित आहेत. ब-याच शेतकऱ्यांना आतापर्यंत काही हप्ते मिळाले तर त्यानंतरचे हफ्ते हे पेमेंट स्टेट्स मध्ये payment proceed असे दाखवून देखील हप्ता वर्ग करण्यात आला नाही. दि ३१ मे २०२२ रोजी हिमाचल प्रदेशमधील सिमला येथे एका कृषी कार्यक्रमात सहभागी होवून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ११ वा हप्ता लाॅंच केला. त्या दिवशी पासून सन्मान निधी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली परंतु अजून ब-याच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे लाभार्थी शेतकरी नाराज झाले आहेत. पेमेंट प्रोसीड स्टेट्स दाखवूनही हप्ता वर्ग केला जात नाही. सबंधित खात्याच्या नोडल अधिका-यांशी विचारना केली असता ते रक्कम जमा होईलच, म्हणून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पि एम किसान सन्मान निधी योजना संदर्भी तक्रार करण्यासाठी दिलेले हेल्प नंबर कधीच लागत नाहीत.किंवा जिल्हा तालूका ठिकाणी तात्काळ समस्या निराकरण करण्यासाठी एखादे कार्यलय किंवा हेल्प सेंटर चालू केले नाही.यामुळे शेतकरी संभ्रमात सापडतात. या संदर्भी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ तक्रार कक्ष चालू करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा आसी मागणी जिल्हाभरातील वंचित शेतकऱ्यांकडून होत आहे.

Previous articleखरीप हंगामात हिमायतनगरची बाजारपेठ फुलली !
Next articleशेतक-यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार!