हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 898331907
आज गोदावरी प्रतिष्ठान नाशिक तर्फे आयोजित गोदा स्वच्छतेचा 154 वा सप्ताह अतिशय उत्साहात संपन्न झाला.
आजच्या कार्याला 27 गोदासेवकांनी आपला सहभाग नोंदवला आणि गोदावरी पात्रातून जवळपास 1000 किलो पेक्षा जास्त प्लास्टिक आणि कपडे बाहेर काढून आपली गोदावरी नदी स्वच्छ आणि वाहती केली.
पुढील काळात सर्व सुरक्षिततेचे साधन वापरून जास्तीत जास्त गोदा सेवकांनी प्रत्यक्ष पात्रातून स्वच्छता करण्याचे नियोजन केलेले आहे.
गोदावरी प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पंडित पाटील यांनी सर्व नागरिकांना असे आवाहन आहे की त्यांनी आपापल्या परीने आमच्या कार्याला प्रत्यक्ष सहभाग घेऊन मदत करावी जेणेकरून आपली गोदावरी कायमस्वरूपी स्वच्छ निर्मळ आणि वाहती करायला सर्वांचा हातभार लागेल.