जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात माणसं…
संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात,
ती ही असतात माणसं…
वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात,
ती ही असतात माणसं…
पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात,
ती ही असतात माणसं…
शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात,
ती ही असतात माणसं…
दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात,
ती ही असतात माणस…
नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी?
सारी असतात आपलीच माणसं… !
रचना :-बालाजी सुब्बनवाड शिकारेकर (सहशिक्षक)
प्रसिध्दी..मारोती अक्कलवाड पा.सवनेकर जिल्हा संपादक नांदेड