योगेश घायवट जिल्ह प्रतिनिधि मो 8888872854
आज श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री. जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगाव येथे संयुक्तरित्या “महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांच्या १३४ व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून बाबासाहेबांच्या प्रतिमा पुजन व हारार्पणाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ शिक्षिका सौ.कमला सावदेकर (अवचार) मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य गोपाल मानकर सर ,उपप्राचार्य अविनाश शिंदे सर ,पर्यवेक्षक गोपाल घनमोडे सर, प्रमुख व्याख्याते लीलेश्वर नराते सर ,कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका कु. पुनम गावंडे आदी मान्यवर प्रामुख्याने विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रास्ताविकातुन लीलेश्वर नराते यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक ध्येय धोरणावर प्रकाश टाकला. विद्यार्थी आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते आहे,विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या चरित्राचे अनुकरण केले तर निश्चितच ते जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत असे मार्गदर्शन त्यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषण आणि गीतातून बाबासाहेबांचा गुणगौरव केला. प्राचार्य श्री गोपाल मानकर सर यांनी आपल्या भाषनातुन बाबासाहेब यांनी सर्वसामान्या करिता जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याला जगात तोड नाही असे प्रतिपादन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात सौ.कमला सावदेकर (अवचार) मॅडम यांनी सांगितले की डॉ.बाबासाहेबांनी शेकडो वर्ष माणूस म्हणून जगायचे विसरलेल्या कोट्यावधी माणसांना त्यांच्यातील माणूस जागा करून माणूस म्हणून जगण्याचा आत्मविश्वास प्रदान केला तसेच संविधानाच्या माध्यमातून जगण्याची संधी प्राप्त करून दिली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अनिता सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन कु.नवेली डोंगरे हिने केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक संतोष हाडोळे ,सौ.प्रिया काळे (चिंचोलकर) मॅडम, श्रीकृष्ण कळंब ,आशिष दांदळे सौ.ज्योती धोटे (मानकर) मॅडम ,संदीप जढाळ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक-शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुतांश विद्यार्थी उपस्थित होते.