Home Breaking News पिककर्ज मिळत नसल्याने शेतक-यामध्ये संतापाची लाट.

पिककर्ज मिळत नसल्याने शेतक-यामध्ये संतापाची लाट.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 09 एप्रिल 2025

सततची नापिकी, अतिवृष्टी, पावसात पडणारा खंड, कृषि शनिविष्ठाचे गगनाला भिडलेले भाव, वाढलेला मशागत खर्च, वाढती मजुरी आणी मिळत असलेले अनअपेक्षित उत्पन्न अश्या अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आज देशोधडीला लागला आहे. युवा, तरुण मुलांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. हमाली बरी..पण शेती नको रे बाबा..असे सहज बोलुन दाखवितात.

विधानसभा निवडणपुर्वी महायुतीने आपल्या जाहीर नाम्यात प्रसिध्द केले होते. शेतक-यांना पिककर्ज माफी मिळणार आहे. पण निवडणुक संपवुन शंभर दिवस पुर्ण होत नाहीत. राज्याचे अर्थमंत्री म्हणतात शेतक-यांनो आपआपले पिककर्ज भरा…

निवडणुक जिंकुन सत्ता स्थापण करुन शेतक-यांच्या जखमेवर सरकारने एकंदरीत मीठ चोळले आहे. असे शेतकरी सांगतात. सरकारने शेतक-यांना मोठा धोका दिला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल अवस्थेत आहे. सरकारने लवकरच कर्जमाफी करुन दिलासा द्यावा. अन्यथा पुढील काळात आक्रोश मोर्चे सरकार विरोधात निघणार असेही जाणकार शेतक-यांनी सांगितले आहे.

👉 पावसामुळे हळद उत्पादक शेतक-यांची दाणादाण.

काल झालेल्या अचानक वादळी वारा, पावसामुळे हळद, ज्वारी, तिळ उत्पादक शेतक-यांची पावसामुळे फजिती झाली आहे.

Previous articleविविध कार्यकारी सोसायटी चापड गाव ता. निफाड च्या पंचवार्षिक निवडणुकीत व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक बंडु नाना दराडे यांच्या पॅनल ला 13 पैकी 13 जागांवर निर्विवाद बहुमत
Next articleसवना ज. सज्जाचे कृषि सहाय्यक यांची सज्जाला दांडी.