मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 एप्रिल 2025
कृष्णा गंगाधर वानखेडे जिल्ह्यात प्रथम
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात एन.एम.एम.एस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात 45 विद्यार्थ्यांपैकी 37 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. कृष्णा गंगाधर वानखेडे हा विद्यार्थी नांदेड जिल्ह्यातून प्रथम तर नांदेड जिल्ह्यातून ओबीसी प्रवर्गातून प्रसाद वच्चेवार हा प्रथम आला आहे. यांचे सह अक्षरा माने, रिया वाठोरे, रिया पाळजकर, अविका कटकमवाड, नेहा गड्डमवार, खुशी वाडेकर, शिवांजली आरेपल्लू, गौरी वानखेडे, वैदेही गुंडेवार, वैष्णवी शिल्लेवाड, दिव्या पेंडकर, विराट कदम, क्षितिज वानखेडे, श्रेयश वानखेडे, धीरज रणशूर, परमेश्वर आरेपल्लू, प्रथमेश हेंद्रे, शौर्य चिंतमवाड, यश तोटेवाड, यश कांबळे, रणजीत नाचारे, पार्थ बनसोडे, पायल बास्टेवाड, आरती कामलवाड, अनिकेत बुद्धेवाड, पौर्णिमा गड्डमवार, विशाल शिल्लेवाड,संकेत नारे, साईराज ढगे, विराज भोयर, अभय वानखेडे, आकांक्षा जेजेरवाड,अक्षरा कांबळे,अस्मिता कदम, गौरी गंदेवार हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंत प्रति वर्ष12000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे शेख सर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांनी एकलव्य स्टडी सर्कलचे संचालक आदरणीय. एन. टी. जाधव सर, शेख सर तसेच भास्कर वाडेकर सर व कोंकेवाड सर यांना दिले आहे.
श्री शेख सर यांनी पत्रकारांशी बोलताना असे आवाहन केले आहे की केंद्र शासनामार्फत आर्थिक दुर्बल घटकांतील पाल्यांसाठी एन. एम .एम. एस परीक्षेचे आयोजन केले जाते. सदरील परीक्षा 180 गुणांची असून ती गणित,बुद्धिमत्ता विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित असते. या परीक्षेत 100 पेक्षा जास्त गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी आतापर्यंत हिमायतनगर तालुक्यातून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. आतापर्यंत एकलव्य स्टडी सर्कल चे 250 पेक्षा जास्त विद्यार्थी सदरील शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत इथून पुढे सुद्धा एकलव्य स्टडी सर्कलमध्ये यापेक्षाही जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतील त्यासाठी वर्ग सातवीतून आठवीत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेस बसावे आणि शासन देत असलेल्या आर्थिक लाभाचा फायदा घ्यावा असे आवाहन श्री एन.टी. जाधव सर व शेख सर यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे.