Home Breaking News खुलताबाद येथे असलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याची विश्व हिंदू परिषदेचे मागणी..

खुलताबाद येथे असलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याची विश्व हिंदू परिषदेचे मागणी..

अंगद सुरोशे

हिमायतनगर प्रतिनिधी /-संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्या मध्ये असलेली मुघल सम्राट औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी हिमायतनगर शहरातील विश्व हिंदू परिषदेने केली आहे. हिमायतनगर येथे आज, (१७मार्च) रोजी विश्व हिंदू परिषद तथा हिंदुत्ववादी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिले संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये खुल्ताबाद तालुक्यात असलेल्या कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की परकीय आक्रमक बाबर यांच्या वंशज असलेला हिंदू द्वेष्टा औरंगजेब याने हिंदू धर्मावर अनेक प्रकारचा छळ तसेच क्रूर पद्धतीने अन्याय केले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाने हिंदू धर्माच्या अनेक मंदिरांना उध्वस्त केले आहे. छत्रपती शाहू महाराजांचा अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.असे निवेदनात नमूद आहे त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारामार्फत निवेदन सादर केले यावेळी संघटन मंत्री श्यामजी रायेवार,महावीर सेठ श्रीमाळ ,कुणाल राठोड,गजानन चायल,प्रवीण जन्नावार,विलास वानखेडे, सोपान कोळगिर,ज्ञानेश्वर लिंगमप्पले,देवा भाऊ,बालाजी ढोणे,गजानन हरडपकर,लक्ष्मण डांगे,गणेश रामदीनवार सह असंख्य विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleमौजे सिरपल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह तथा तपपुर्ती सोहळ्याचे आयोजन.
Next articleहिमायतनगर तालुक्यातील पांदण रस्त्याला लागला ब्रेक.