तालुका प्रतिनिधी:-
( देगांव / १९ फेब्रुवारी ) – स्थानिक बाळापूर तालुक्यातील देगांव येथील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती उत्साहात साजरी करण्यांत आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम प्रल्हाद अंभोरे होते. त्यांचे हस्ते छत्रपती शिवरायांच्या दिव्य प्रतिमेस हारार्पण करण्यांत आले. दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक डॉ. अशोक शिरसाट यांनी केले. छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैलू डॉ.शिरसाट यांनी विषद केले. प्रांजली अंभोरे व अंजली अंभोरे दोघी बहिणींनी मराठी बरोबरच इंग्रजीतून मुद्देसूद भाषण केले. तसेच नागसेन अंभोरे, मोहन अवचार राधिका गावंडे , शीतल राऊत , श्रीकृष्ण अंभोरे, संतोष महाराज रेवास्कर, रमेश अंभोरे , आशाबाई तायडे ,आदिंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्रावर समयोचित भाषणे झालीत. छोटया मुलींनी छत्रपती शिवरायांच्या यशोगाथेवर गीत गायन व पोवडा सादर केला. याप्रसंगी विश्वनाथ इंगळे , मनोज अंभोरे , आकाश इंगळे, गजानन नाटकर, राजु इंगळे , राजश्री इंगळे , अभिजीत इंगळे आदि मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. शेवटी गौतम प्रल्हाद अंभोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन प्रांजलीने केले , तर राधिका गावंडेने सर्वांचे आभार मानले.