हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिंदी प्राथमिक विद्यालय, राणे नगर माध्यमिक विद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, या विद्यालयामध्ये आज शिवजन्मोत्सव (शिवजयंती) मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे जेष्ठ विश्वस्त श्री. लक्ष्मण नाना जायभावे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तसेच संस्थेचे स्थानिक संचालक रमेश भाऊ वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित आपली भाषणे व विविध कार्यक्रम साजरे केले. उपस्थित विद्यार्थ्यांना विश्वस्त लक्ष्मण नाना जायभावे ,संचालक रमेश भाऊ वाघ, श्रीम.देशमुख मॅडम व इतर अनेक मान्यवरांनी रोख स्वरूपात बक्षिसांचा वर्षाव केला. विद्यालयाचे कलाशिक्षक .डी.आर.सांगळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एस. एन. वाघ सर यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. लक्ष्मण नाना जायभावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित माहिती सांगितली. तसेच त्यांच्या एक तरी गुणाचे आपण अनुकरण केले तर त्यांना खरी आदरांजली दिल्यासारखी होईल व सर्वांनी त्यांच्या सदगुणांचे अनुकरण करावे असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये अनेक स्वरूपाचे सुप्त गुण असतात हे त्यांनी केलेल्या भाषणावरून लक्षात येते असे सांगितले आणि विद्यार्थ्यांचे भाषण ऐकून भारावून गेल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .के. पी. कापडी सर , प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. पी. सांगळे सर व आभार पर्यवेक्षिका श्रीम.एम. व्ही. नाईक मॅडम यांनी मानले.
या शिवजयंतीच्या निमित्ताने संस्थेचे विश्वस्त लक्ष्मण नाना जायभावे ,संचालक रमेश भाऊ वाघ हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अलगट व्ही.के.सर ,पर्यवेक्षिका श्रीमती एम. व्ही नाईक मॅडम , राणे नगर विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.पी.सांगळे सर, मुख्याध्यापिका यादव मॅडम, मुख्याध्यापिका थोरे मॅडम सर्व चारही विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.