मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 18 फेब्रुवारी 2025
हिमायतनगर तालुक्यातील मौजे डोल्हारी येथील महिला बचत गटांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी हिमायतनगर पंचायत समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला विशेषता ग्रामीण भागातील महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. त्यास अनुशंगाने डोल्हारी येथील महिला बचत गटांनी सुरू केलेल्या नविन पापड उद्योग व हळद कुकरचे उद्घाटन आज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणी हिमायतनगर प्रभारी तालुका कृषि अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या महिला बचत गटांनी सुरू केलेल्या उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव साहेब यांनी सविस्तर महिला मंडळाला मार्गदर्शन करतांना ते म्हाणाले ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांनी न डगमगता नवनविन व्यवसायाला सुरुवात करावी…आम्ही त्यांना पुर्णपणे सहकार्य करु असे आश्वासन दिले….महिला या जास्तीत जास्त बचत करु शकतात..हे वेळोवेळी बचत गटांनी आजरोजी सिद्ध केले आहे. यावेळी प्रभारी तालुका कृषि अधिकारी एम.एस. काळे, विस्तार अधिकारी पंचायत समिती प्रमोद टारफे आधी कर्मचारी, नागरीक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या..