Home Breaking News पैनगंगा नदी जवळील वारंगटाकळी येथुन अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त….पोलीस पथकाने केली...

पैनगंगा नदी जवळील वारंगटाकळी येथुन अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त….पोलीस पथकाने केली कारवाई…. 

अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनिधी:-

कर्तव्यदक्ष मा.अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती उपसा व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कडक आदेश पोलिस स्टेशनला अचानक भेटी दरम्यान दिले होते.

त्या आदेशाचे पालन करत दिं.०९ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय खबर्रा मार्फत माहिती प्राप्त झाली की, पैनगंगेच्या नदी पात्रातून मौजे वारंगटाकळी कडुन एक महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर रेती भरुन चोरटी वाहतुक करीत आहे. सर्व बाजूंनी माहिती उपलब्ध केल्या नंतर व खात्री मिळाल्याने पोलीस स्टेशनचे पथक त्या ठिकाणी गेले असता दुपारी अंदाजे ०४:२४ मिनिटाला उल्लेखित लाल रंगाचे ट्रॅक्टर आले असताना ट्रॅक्टरला थांबुन तपासणी केली असताना त्या मागील ट्रॉली मध्ये अंदाजे दोन ब्रास रेती भरलेली दिसुन आली आहे.म्हणुन संबंधित आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नमुद गुन्ह्यात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर वाळुने भरलेल्या ट्रॉली सह किंमत अंदाजे ३,५०,०००/- रुपये व अंदाजे दोन ब्रास रेती किंमत अंदाजे १०,०००/- रुपये.अशी एकूण ३,६०,०००/- रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार पो.हे.को/१५५२ मेंडके यांच्या फिर्यादी वरुन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे वय २३ वर्षे रा.बोरगडी,विश्वाबंर काणवटे रा.वारंगटाकळी ता. हिमायतनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पुढील तपास पो.हे.कॉ/२५७८ सुरकुंटे हे करीत आहेत.या कारवाईमुळे तहसील कार्यालय पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे टाकले आहे.पैनगंगा नदी जवळील गावातुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व वाहतूक जोरात होत आहे.या अवैध रेती उत्खनन व वाहतूकीस स्थानिक तहसीलदार, नायब तहसीलदार,मंडळाधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने दिवस रात्रीला दररोज अवैध रेती,मुरुम,दगड उत्खनन व वाहतुक चालु आहे.तालुक्यात अवैध वाहतुकीमुळे लाखो रुपयांचा गौण खनिज महसूल बुडविला जात आहे.केवळ गौण खनिज जप्त पथके कागदावर अस्तित्वात आहेत.या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीकडे अविनाश कांबळे उपविभागीय अधिकारी हदगाव यांनी साफ दुर्लक्ष केल्यामुळे आजपर्यंत लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.यावर आळा घालण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शासकीय रेती स्थळांचा जाहीर लिलाव करुन जनतेला तात्काळ रेती उपलब्ध करून देतील काय? अशी मागणी जोर धरत आहे.

Previous articleजलंब श्रीपाई विद्यालयात माजी विदयार्थीचे सम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न 
Next articleशेतीला पूरक अधिक उत्पन्न देणारा शेळी पालन व्यवसाय— श्री. सिद्धेश्वर (बापू) शिंदे