तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे आव्हान…..
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करून बँक पासबुक मोबाईल क्रमांक सह सादर करावा.
माननीय सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन लाभार्थ्यांना अर्थसाह्याचे वितरण डी.बी.टी.द्वारे पोर्टलवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी माहे फेब्रुवारी 2025 अर्थसाहाय्य केवळ डीबीटी पोर्टलवर onboard व Aadhar validate झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे असे निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हिमायतनगर तालुक्यातील काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंडळ निहायक मंडळ निहाय कॅमचे आयोजन करण्यात येत असून आपल्या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल क्रमांक (आधार सेंटरवर) लिंक करून बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणि चालू मोबाईल नंबर तसेच वयस प्रमाणपत्र यापूर्वी सादर केली नाही त्यांनी लग्न करण्यासाठी तहसील कार्यालय हिमायतनगर येथे सादर करावा.
सदर माहिती सादर न केलेल्या लाभार्थ्याचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र वर नमूद केलेल्या कॅम्पच्या दिवशी आपण स्वतः आधार लिंक करून हजर राहावे असे आवहान तहसीलदार हिमायतनगर पल्लवी टेमकर यांनी केले आहे..