ग्रामीण प्रतिनिधी संदिपदेवचे9860426674
.खामगाव शहरात जगत्गुरू संत तुकाराम महाराज जयंती सोहळया येत्या २ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे था सोहळ्याला गेल्यावर्षीपेक्षाही मोठे स्वरूप येणार असून सुमारे १० हजार भाविकांच्या मुखातून तुकोबांचा जयघोष होणार असल्याची माहिती आहे. जयंती उत्सव नियोजन समितीकडून मावोगावी जावून बैठका घेण्यात येत आहेत. आतापर्यंतचा सर्वात भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा उत्सव पार पाडण्यासाठी सर्वच जण परिश्रम येत असल्याचे दिसून येत आहे.
चारकरी सांप्रदायातील ‘कळस’ अशी महानता अंगी असलेल्या जगत्गुरू संत तुकाराम महाराजऱ्यांची २ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. खामगाव येथे दरवर्षीच जगत्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या पतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात येते. परंतु गेल्यावर्षीपासून या सोहळ्याला विशाल स्वरूप आले आहे. अत्यंत भव्य-दिव्य पध्दतीने साजरा होणारा हा उत्राव यावर्षी तर मागीलवर्षपिक्षाही मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे, असे नियोजनावरून दिसून येत आहे. यासाठी आतापर्यंत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. उदयनगर येथे झालेल्या बैठकीत किन्ही, पिंप्री चिंचपूर, डासाळासह आजुबाजुच्या अनेक गावांमधील भाविक उपस्थित होते. याचप्रमाणे अटाळी, शहापूर, अंत्रज, हिवरखेड, काळेगाव, भालेगाव लांजूड, पहरगिरा, नलंब.
अशा विविध गावांमध्ये संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बैठका घेवून सोहळ्याबाबत जनजागृती करण्यात आली. बागावांमध्ये आजुबाजूच्या अनेक गावांमधील भाविक सहभागी झाले. बैठकांना मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून वावर्षीचा उत्सव मागीलवर्षपिक्षा मोठा होईल असे दिसून येत आहे. भाविकांचा प्रचंड प्रतिसाद नियोजन समितीला मिळत असून मोतछा संख्येने सहभागी होण्याबाबत अश्वस्त करण्यात येत आहे.
संत तुकाराम महाराज जयंती सोहळ्यानिमित्त खामगाव शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार असून शोभायात्रेत सहभागी होणान्या भाविकांसाठी ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. पुरुष भाविकांना पांढऱ्या रंगाचे शर्ट, पायजामा आणि टोपी तर महिला भाविक पिवळ्या रंगाची साडी परिधान करून शोभायात्रेत सहभागी होतील. एकंदरीत भव्य, दिव्य आणि शिस्तबध्द पध्दतीने जगत्गुरू संत तुकाराम महाराज जयंती सोहळा खामगाव शहरात पार पडावा यासाठी उत्सव नियोजन समिती परिश्रम घेत आहे.
खामगाव तसेच परिसरातील भाविकांनी इजारोंच्या संख्येने असे आवाहन संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या जयंती उत्सवात सहभागी व्हावे पतीने करण्यात आले आहे..