प्रविण सुखलाल इंगळे…
आज दि. 24/1/2025 रोजी भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा महासचिव आदरणिय नंदकुमार डोंगरे यांनी आमचे राहते घरी येऊन माझे वडील सुप्रसिद्ध कवी गायक सुखलाल इंगळे यांची गेल्या काही दिवसांपासून तब्बेत बरी नसल्याने माझ्या वडिलांची भेट घेऊन ₹5000 ची अनमोल अशी आर्थिक मदत केली. त्यावेळी बोलतांना आदरणीय नंदकुमार डोंगरे. यांनी माझे वडील सुप्रसिद्ध कवी गायक सुखलाल इंगळे यांच्याविषयी त्यांची असणारी आपुलकी व प्रेम, जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले सुखलाल इंगळे यांनी मला त्यांच्या एका कॅसेट मध्ये गित गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर मी गायकिकडे लक्ष देऊ शकलो नाही कारण मी भारतीय बौध्द महासभेचा पदाधिकारी असल्याने मला गायकीकडे लक्ष देता आले नाही. आदरणीय डोंगरे. हे भारतीय बौध्द महासभेचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांचे वर्षभर दौरे सुरू असतात, तरी सुद्धा वेळात वेळ काढून आदरणिय नंदकुमार डोंगरे हे माझ्या वडिलांच्या भेटीसाठी येऊन मदत केली त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय त्यांचे ऋणी राहू. याचवेळी भारतीय बौध्द महासभा जिल्हा सचिव आदरणिय विलास बावस्कर, केंद्रीय शिक्षक दादाराव दाभाडे व सुप्रसिध्द कवी गायक देवरावदादा अंभोरे हे प्रामुख्याने उपस्थीत होते. यावेळी आदरणिय देवरावदादा अंभोरे यांनी नंदकुमार डोंगरे. यांचे केलेल्या मदतीसाठी मनःपूर्वक अभिनंदन केले. आज रोजी माझ्या घरी आलेल्या वरिल सगळ्या आदरणिय मंडळींचे मी माझ्या कुटुबियांतर्फे मनःपूर्वक आभार