हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांनी इतर कला-गुणांनाही वाव द्यावा .
कोंडाजी (मामा) आव्हाड
हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर , मुंबई नाका, नाशिक. येथे उत्साहात पार पडले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा .कोंडाजी (मामा ) आव्हाड होते.
प्रथमत : प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्ज्वलन व माता सरस्वती ,क्रां. वसंतराव नाईक, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.व्ही.के.अलगट सर यांनी केले. तसेच शाळेचा अहवाल विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती एम. व्ही.नाईक मॅडम यांनी उपस्थितांसमोर सादर केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला .व सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे जेष्ठ विश्वस्त तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा .लक्ष्मण (नाना )जायभावे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा आपल्या भाषणातून घेतला.तसेच विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षिका शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या उत्कृष्ट कामाचे त्यांनी कौतुक केले.
संस्थेचे सरचिटणीस हेमंत (आप्पा )धात्रक यांनी आपल्या भाषणातून हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे परिसरातील अतिशय जुने आणि नावलौकिक असलेले विद्यालय असून विद्यालयाची अशीच परंपरा सतत चालू ठेवण्याचे काम आपण करावे असे आवाहन केले .
आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मा. कोंडाजी (मामा ) आव्हाड सांगितलं की, फक्त अभ्यास करूनच करियर करता येते असे नाही तर इतर कला व क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करून योग्य करियर करता येते. विद्यार्थ्यांनी नेहमी विद्यालयातील इतर स्पर्धात्मक कला, क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे. असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विविध कलागुण दर्शनाच्या कार्यक्रमापूर्वी रंगमंचाचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कोंडाजी (मामा ) आव्हाड ,सरचिटणीस हेमंत (आप्पा )धात्रक ,ज्येष्ठ विश्वस्त तथा शालेय समितीचे अध्यक्ष श्री.लक्ष्मण (नाना )जायभावे, विश्वस्त श्री.दामोदर ( आण्णा ) मानकर संस्थेचे संचालक श्री . नारायण काकड ,श्री. संपतभाऊ वाघ , श्री.प्रल्हाद काकड, श्री.रमेश वाघ व इतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला गुणांचे प्रदर्शन उपस्थित सर्व पालक व मान्यवरांच्या समोर सादर केले .सादरीकरणात , समूहगीत,देशभक्ती पर गीते, गोंधळी नृत्य ,वैयक्तिक गीते,भोजपुरी गीते,एकपात्री प्रयोग, रामायण सादरीकरण, शिवतांडव नृत्य व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली .
लहान मुलांच्या अंगी असलेल्या या कला गुणांची अनेक मान्यवरांनी व प्रेक्षकांनी कदर करून त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
या प्रसंगी मोरवाडी व सिडको परिसरातील सर्व मान्यवर , अनेक सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग, माजी विद्यार्थी, शाळेचे हितचिंतक, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.के. पी. कापडी, रेखा धात्रक मॅडम, चौधरी सर यांनी केले . तसेच आभार प्रदर्शन श्री एस. के.काळे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला .