Home Breaking News जलंब श्री.पाई विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

जलंब श्री.पाई विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674(दि.20 जानेवारी 24)

 

जलंब – येथील श्री पाई विद्यालयात सन 1998-99 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये मैञि सोहळा ,स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी गडचिरोली, मुंबई,नागपुर पुणे नाशिक जळगाव इत्यादी ठिकाणावरून जवळपास 150 माजी विद्यार्थी परिवारासह उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शालेय जिवनातिल जुन्या आठवणींना उजाळा देऊन एकमेकांची आस्थेने चौकशी केली, सदरच्या कार्यक्रमात श्री पाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार राठी यांनी स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाई हायस्कूल चे प्राचार्य काळे सर,पयसोडे सर,खर्चे सर,सोनटक्के सर,देशमुखसर,देवचेसर,नाफडेसर,खर्चे सर, घोपे सर,दात्तिरसर रोकडेसर,खुमकर मॅडम, निंबोळकर सर निवाणेसर,राणेसर,अभिषेक जामोदे सर श्रीकृष्ण असंबे सर व शिक्षकेतर कर्मचारी बंडु भारती व मोरे भाऊ यांचा माजी विद्यार्थ्यांकडुन स्नेहपुर्ण सत्कार करण्यात आला.शिक्षकांनी सत्काराला उत्तरे देत असतांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून भावि जीवनात यश संपादनासोबतच भावि पिढी साक्षर व सुसंस्कृत कशी घडेल यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले व सर्वाचे कौतुक केले.

शाळा भरण्याची सुरूवात जशी होते तशी शाळेची घंटि वाजवून एक दिवसाची शाळा भरवण्यात आलि त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सुरूवात केली.नंतर दीपप्रज्वलन व मा सरस्वती मातेची पुजा केली त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार आणी त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. पहिल्या सञाच्या शेवटी स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारच्या सत्रात गित गायनाचा कार्यक्रम दत्ता जवळकार आणि श्रीकृष्ण नालट यांनी तर हास्य विनोदी कार्यक्रम व परिचय आणि फिस फाण्डचा कार्यक्रमाचे सादरीकरण सतिश खुरद यांनी केले, फिस फाण्डचा बहारदार कार्यक्रम झाला, यावेळी सुञ संचालन अमोल काळे सर यांनी प्रास्ताविक श्रीकृष्ण नालट यांनी तर आभारप्रदर्शन दत्ता जवळकार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश खुरद,अशोक आकोटकर,प्रमोद वडोदे,पि एस आय ज्ञानेश्वर लांडे,गणेश कुटे,प्रमोद काळे,निलेश अग्रवाल, सुनिल राऊत,गणेश चौधरी, श्रीराम देवचे,गोपाल उगले, गोपाल भिसे,निलेश चांडक,गजानन कापसे,नितीन गावंडे,हरिदास गावंडे,संदिप वाघमारे, प्रमोद झळके,नितीन कापडे,

श्याम खोंड,पुरूषोत्तम आवरकर,गजानन कोरडे,योगेश खुमकर,आशिष दुटे,नितीन गव्हांदे,सुनिल बोरकर ,निलेश विरघट,संदीप काळे, गजानन मिरगे,गौतम निंबाळकर, सोपान धामनकर,राहुल दामोदर, मनोज बासोडे,राम तायडे,राकेश राजपुत,अनिल कंठाडे,परमेश्वर कंठाळे,श्याम गटमने,गोविंदा तांदुळकर,रविंद्र पारस्कार,शंकर उगले,भास्कर मंडवाले,महादेव बुंदे,संजय डाबेराव, माया गिरी,मनिषा पारस्कार, स्मिता गावंडे,रिना बनसोड,रंजना पारस्कार, योगिता सोनटक्के, मंदा कोकाटे,संगिता देवचे,रेखा देवचे,पद्माताई सोनटक्के, गंगा असंबे, लता पहुरकर,राजश्री फुलकर ,भारती पहुरकर, रंजना वाघमारे, ज्योती ठाकरे, सिमा मंडवाले,जयश्री कुळकर्णी, माधुरी वरूडकर,नंदा महाले,उज्वला सिरसाठ, शालू कांबळे, उज्वला तायडे,आशा भोंगे,वैशाली जांभे,रेखा पायघण,भावना तेलगोटे,आशा देवचे ,कावेरि देवचे, दुर्गा घानखेडे, उज्वला लांजुडकर,दुर्गा शेजोड शिवमाला राजपुत यासह अनेक माजी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleअन्याया विरुद्ध लढणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे कार्य प्रेरणादायी – प्रसिद्ध लेखक देविदासजी पोटे यांचे गौरोद् गार.
Next article*💐💐मारोतीराव एंबडवार यांचे दुःखद निधन*💐💐