हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चे कार्य प्रेरणादायी .. प्रसिद्ध लेखक देविदासजी पोटे यांचे मनोगत ( शब्दांकन श्री. निलेश विठ्ठल बाविस्कर पत्रकार नाशिक) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यातील शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय विकास मंडळ तर्फे नाशिक येथे आज पुण्यश्लोक राजमाता यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ज्येष्ठ वक्ते देविदास जी पोटे साहेब बोलत होते. या कार्यक्रमास सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक आदरणीय श्री. नारायणजी न्हाळदे साहेब, धनगर समाज विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री, बापूसाहेब शिंदे, प्रा.डॉ.जी डी मस्के सर, अतुल दादा चौधरी ,किरणजी थोरात पत्रकार हेमंत शिंदे रामेश्वर खनपटे, यांच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत. राज्य सुजलाम सुफलाम व्हावे दृष्टिकोनातून जन कल्याणकारी योजना राबवून आदर्श निर्माण केला. अन्यायग्रस्ताला न्याय देण्याबाबत न्यायव्यवस्था देखील आदर्श होती राज्यव्यवस्था आदर्श नमुनेदार सात्विक विचारांची होती. असे देखील वक्त्यांनी मनोगतात स्पष्ट केले.