हिमायतनगर येथील भाजपा संपर्क कार्यालयास भेट देऊन शहरातील व्यापाऱ्यांची भाजपा परिवारात केली सदस्य नोंदणी…
आगामी काळात संघटन पर्व 2025 मोहीम अधिक व्यापक करा….
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी
आगामी जिल्हा परिषद,नगर पंचायत,ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र सह जिल्ह्यात सदस्य नोंदणी मोहीम अधिक व्यापक प्रमाणात राबवणे सुरू आहे त्या सदस्य मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक 15 जानेवारी रोजी संघटन पर्व 2025 ची सदस्य नोंदणी बैठक हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे यांनी असे सांगितले की शहरा सह तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकांच्या भेटी घेऊन डोअर टू डोअर भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबवून आगामी काळात भाजपा संघटन मजबूत करा व भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवा यासाठी बूथ प्रमुखासह सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे अनमोल मार्गदर्शन केले…
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटन मंत्री प्रकाश भाऊ कोडगे यांनी प्रथमतःभारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , आ.मा.रवींद्र चव्हाण ,नांदेड जिल्ह्याचे भाजपा नेते खा.अशोकराव चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार हिमायतनगर येथील भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांची तालुक्यातील सदस्य नोंदणी अभियान गतिमान सुरू असल्याचे दिसून आले पण आता ही सदस्य नोंदणी हर घर भाजपा म्हणून करा असे सांगितले
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यावर आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे एक हाती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व हिमायतनगर तालुक्यातील भाजपा वाढीसाठी शहरा सह तालुक्यातील बाजारपेठेतील सर्व नागरिकांच्या डोर टू डोर भेटी घेऊन भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये नागरिकांना व मतदारांना सहभागी होण्यासाठी लोकांना विनंती करून हदगाव विधानसभेवर आगामी काळात एकहाती सत्ता आणण्यासाठी शहरातील प्रत्येक वॉर्डांमध्ये भाजपा सदस्य नोंदणी मोहीम सुरू करून सर्व प्रमुख पदाधिकारी संयोजक व मंडल अध्यक्षांना २५० च्या वर सदस्य नोंदणी करा व हर घर भाजपा, संघटन पर्व 2025 ची भाजपा सदस्य नोंदणीची मोहीम अधिक व्यापक पने तालुक्यात राबवा अशा सक्तसुचना भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे यांनी दि 15 जानेवारी रोजी हिमायतनगर येथील भेटी दरम्यान कार्यकर्त्यांना दिल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे ओ.बी.सी.जिल्हा अध्यक्ष गणपत पिटेवाड ,बूथ जिल्हा संयोजक बाबुराव केंद्रे,महाराष्ट्र सदस्य मारकमवार, जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल, शहराध्यक्ष विपुल दंडेवाड,लक्ष्मण डांगे, ज्ञानेश्वर माने, राम पोलसवाड, दुर्गेश मंडोजवार, कल्याण ठाकूर, परमेश्वर नागेवाड, सह असंख्य भाजपा पदाधिकारी व युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…