हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
डॉ.कल्पेश शिंदे यांची नाशिक शिवसेना ओबीसी /व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष पदी निवड
मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय भाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे व्हिजेएनटी/ ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते दि ११ जानेवारी रोजी मुंबई येथील शिवसेना बाळासाहेब भवन येथे नाशिक जिल्हाध्यक्ष पदी डॉ कल्पेश जिजाबा शिंदे यांना नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली असून शिवसेना ओबीसी/व्हिजेएनटी
नाशिक जिल्हाध्यक्ष पदी डॉ कल्पेश शिंदे यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करून नाशिक जिल्हयाची मोठी जबाबदारी डॉ कल्पेश जिजाबा शिंदे यांच्या वर देण्यात आली ,
असून हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात एकनिष्ठपणे काम करत अनेक क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेना व्हिजेएनटी/ओबीसी नाशिक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर बाळासाहेब भवन येथे नियुक्ती पत्र समयी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक विषयावर प्रकाश टाकला यावेळी महाराष्ट्र राज्य समन्वयक मारोती जानकर . धुळे जिल्हाप्रमुख तथा सोशल मिडीया राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय कुसळकर, नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने, पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे, हिगोली जिल्हाप्रमुख बऺटी राठोड, सातारा जिल्हाप्रमुख हेमंत भोईटे, राजेश्वर पाटील आदींच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते देण्यात आले असून या नियुक्ती पत्रावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार, प्रसार कराल व तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्व घटकांना सोबत घेऊन संघटन वाढवून कार्य कराल असा विश्वास व्यक्त करून आपणास पुढील कार्यास शुभेच्छा देतो असा उल्लेख नियुक्ती पत्रात केलेला आहे.
या निवडी बद्दल शिवसेना ओबीसी/ व्हिजेएनटी नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांनी शिवसेना बाळासाहेब भवन येथे आपले मनोगत प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांना शुभेच्छा देत संघटनेच्या ध्येय धोरणा विषय थोडक्यात मागदर्शन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.