मिनकी येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक 10 जानेवारी 2024
महागडी शिक्षण पध्दत, त्यावर होणारा अमाप खर्च, खाजगी शिकवण, शैक्षणीक साहित्यावर होणारा वाढता खर्च. हे सारं शेतीच्या उत्पन्नातुन आपल्या पाल्याचे शिक्षणाचा खर्च शेतक-यांना झेपत नाही….महागाई, बेरोजगारी हि सुध्दा कारणे या गोष्टीला कारणीभुत आहेत. असेच एक प्रकरण उदगीर येथील एका शाळेत दहावी च्या वर्गात शिकणारा ओमकार लक्षण पैलवार नावाचा 16 वर्षाचा मुलगा संक्रांती निमित्त गावी (मिनकी) आला होता.
घरी येऊन त्याने सणानिमित्ताने नवीन कपडे आणि काही शिक्षणाचे साहित्य घेऊन देण्याची वडिलांकडे मागणी केली होती.
वडीलांनी सध्या आपल्याकडे पैसे नाहीत, पैसे आले की तुला नवीन कपडे आणि शैक्षणिक साहित्य घेऊन देईन असे सांगितले होते.
पण मुलाच्या मनात कसले विचार आले ते त्यालाच ठाऊक.. तो सकाळी उठला सरळ शेतात गेला आणि गळफास लावून स्वतःला तिथेच संपवून टाकले.
मुलगा (ओमकार) घरी आला नाही म्हणून आई वडील भाऊ सर्वांनी शोध घ्यायला सुरुवात केली. शोधत शोधत वडील शेताकडे आले, पाहतात तर मुलगा झाडाच्या फांदीवर लटकत होता.
मुलाने फाशी घेतल्याची कसलीही माहिती घरच्यांना न देता वडील लगेच झाडावर चढले, मृतदेहाला अलगद खाली सोडून, त्याला खाली झोपवत मुलाने ज्या दोरीने फाशी घेतली त्याच दोरीने त्याच क्षणी वडीलांनी ही फाशी घेऊन स्वतःचे जीवन संपवले.
भीषण आहे हे..
शेतीची आणि शेतकऱ्याची गाथा..