हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात श्रीक्षेत्र घोडेगिरी बिरोबा पालखीचे नाशिक पुण्यनगरी हार्दिक स्वागत करण्यात आले पारंपारिक वेशभूषित ढोल दफाच्या तालावर भंडाऱ्याची उधळण करत राम कुंडे पंचवटी येथे अतिशय भव्य मिरवणूक काढण्यात आली . पारंपारिक संस्कृती संवर्धनातून समाज संघटन या हेतूने तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यातील त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने
यावेळी हजारो समाज बांधव, बिरोबा भक्त परिवार उपस्थित होता बिरोबाच्या नावानं चांगभलं… बाळूमामाच्या नावानं चांगभलं… या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता . या पालखी मिरवणुकीत संस्कृती परंपरा चालीरीती आणि देव देवतांचे जतन करण्यासाठी तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचे स्मरण व्हावे म्हणून आयोजन करण्यात आले होते. पालखी मिरवणुकीने काही काळ वाहतूक व्यवस्था उलमडली होती. मशीनच्या साह्याने भंडाऱ्याची उधळण पाहण्याचे अप्रतिम दृश्य भाविकांना दिसून आले.
या कार्यासाठी विशेष योगदान श्री विजय हाके साहेब ,श्री एच सी.शिंदे साहेब , छगन शेठ पाटील,श्री पिसाळ साहेब श्री रोकडे रावसाहेब ,श्री राजू जाधव ,डॉक्टर गावडे, शेगर साहेब यांचे विशेष योगदान लाभले,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबासाहेब टरफले ,अंकुश कोरडे, ज्ञानेश्वर खनपटे ,मुंजाबा ढोले, पंढरीनाथ कोरडे, राजू बादाड ,बाबुराव हिंगे, निलेश बाविस्कर, निलेश हाके, सचिन तायडे, हेमंत शिंदे, प्रज्वल पानसरे, आदी सह अनेक बांधवांनी विशेष परिश्रम घेतले
या भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे सिद्धेश्वर बापू शिंदे यांनी केले होते.