शेवटच्या कुस्तीचा मानकरी बोरगडी येथील निलेश पैलवान ठरला....
अंगद सुरोशे
हिमायतनगर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या पाच शिव महादेव मंदिर यात्रेच्या शेवटच्या दिवशी भव्य कुस्त्यांचे दंगल पाहायला मिळाली या कुस्तीच्या दंगलीमध्ये असंख्य मल्लखांनी सहभाग नोंदवला होता ही कुस्ती स्पर्धा रात्री साडेसहा वाजता शेवटच्या मानाच्या दोन कुस्त्या संपन्न झाल्या त्यात शेवटच्या कुस्तीचा मानकरी बोरगडी येथील पैलवान निलेश शन्नेवाड हा मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला ह्या कुस्त्या पाहण्यासाठी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, पोलीस निरीक्षक अमोल भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड,विलास वानखेडे,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जैन, दत्ता शिराने, नागेश शिंदे, सह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते