अगद सुरोशे:-
नांदेड – युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्यातर्फे दिला जाणारा “उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025” या पुरस्काराने पत्रकार विजय नारायण वाठोरे व दाऊ गाडगेवाड यांचा नागपूर येथील युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
पत्रकार विजय वाठोरे व दाऊ गाडगेवाड यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.पत्रकारितेतून समाजसेवा करत सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्रोही बाणा ठेवत ज्वलंत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी दोघांचेही कार्य वाखानन्यायोग्य आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, ज्येष्ठ पत्रकार गंगाधर वाघमारे,गंगाधर गायकवाड,धोंडोपंत बनसोडे,पाशा खतीब,विष्णू जाधव,रमेश पंडित,नागोराव शिंदे,गणपत नाचारे, संघप्रिया कवडे,डॉ.संदेश नांदेडकर, राजरतन वाठोरे,चंदू वाठोरे यांच्यासह आदि जणांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.