अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी
किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे सलग पंधरा वर्षे प्रतिनिधित्व करणारे बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक स्वर्गीय प्रदीप नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे बंजारा समाज पोरका झाला आहे असे नितीन राठोड कांडलीकर यांनी म्हटले आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना नितीन राठोड कांडलीकर म्हणाले की,किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपले आयुष्य वेचले होते, या मतदारसंघात वाडी वस्ती आणि आदिवासी बांधवांचे पाड जास्त प्रमाणात आहेत, अनेक वर्षापासून या भागात रस्ते,पाणी आरोग्याची सुविधा नव्हती होती परंतु प्रदीप नाईक हे जेव्हापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते तेव्हापासून प्रत्येक तांड्यात वाडी, वस्ती आणि पाडावर रस्ता पाण्याची व्यवस्था आणि आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. माजी आमदार प्रदीप नाईक साहेब हे यांच्या आकस्मित निधनामुळे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील आणि राज्यातील बंजारा समाजाचा फार मोठी हाणी झाली असून बंजारा समाजाचा एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड केला आहे. स्व.प्रदीप नाईक यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व बंजारा समाज बांधव सहभागी आहोत असे शेवटी नितीन राठोड कांडलीकर यांनी म्हटले आहे.