…एक वर्षापूर्वी राहत्या घरासमोर उभी असलेली गाड़ी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674
जलंब: माटरगाव येथील अज्ञात चोरट्याने क्रुझर गाडी लंपास केली होती. त्या गाडीचा जलंब पोलिसांनी एक वर्षानंतर शोध लावला असून आरोपीला गाडी सह पकडून असल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली.
याबाबत असे की जलंब पो. स्टे अंतर्गत जवळच असलेल्या माटरगाव येथील रहिवाशी विनोद वाकोडे यांच्या घरी असलेली क्रुझर गाड़ी क्र. एमएच १९ सी यु ३६७२ ही गाडी दि.२३ जानेवारी २०२४ रोजी चोरट्याने चोरून नेली होती याबाबतची तक्रार जलंब पो. स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भावी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाची चक्रेफीरवित सापळा रचुन 1 वर्षापूर्वी
गाडीचा एक वर्षानंतर ५ जानेवारी रोजी शोध लाउन माटरगाव येथून गाडी सह आरोपी ला ताब्यात घेतले असून आरोपीयाला उटक केली
सदर कारवाई दरम्यान जलंब पोलीस स्टेशन चे थानेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्याम पवार, कैलास देव साहेब पोहेका सचीन बावने होनमाने साहेब संदीप गावंडे रविन्द्र गायकवाड़ अमोल कवळे रितेश मसने यांनी गाडी सह आरोपी 1 आरोपी शिवलालसिह हरचंदसिह राजपुत रा खोलखेड याला माटरगाव येथुन ताब्यात घेतले असुन पुढील तपास सुरु आहे..