Home Breaking News आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी  भूमीराजा च्या अॅकर शितलताई शेगोकार यांची...

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी  भूमीराजा च्या अॅकर शितलताई शेगोकार यांची नियुक्ती 

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमची शेगाव येथे आढावा बैठक दिनांक चार एक 2025 रोजी विश्रामभवन शेगाव येथे पार पाडली असता शेगाव येथील शितल शेगोकार यांची आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे तर प्रकाश सरदार प्रदेशाध्यक्ष महेंद्र सावंत देवचंद समदूर भाई सिद्धार्थ पैठणी पंडित परखर मोर रामेश्वर खरात मेहकर महादेव धायसे वाशिम पद्मा मोहोळ मंगळूर पीर विनोद कुमार गणवीर तसेच मोनाली मॅडम कारंजा लाड आबाराव वाघ विकास खरात भानुदास पवार भिकाजी दाभाडे इत्यादी उपस्थित होते सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे स्वागत करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले या संघटनेची स्थापना मागील वर्षी झालेली असून संघटनेत राज्यभरातील जवळपास 300 बौद्ध पत्रकार सभासदांची संख्या असून दररोज नवीन नवीन सदस्य जुळत असल्याची माहिती दिली आहे तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 स*** सुरू केलेल्या मूकनायक वर्तमानपत्राचा सन्मान व मानवंदना म्हणून भव्य मूकनायक सन्मानपत्रकार दिन साजरा करण्यात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला युवकांचे प्रेरणास्थान सुजात दादा आंबेडकर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्याचा एकमुखी ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला तर सुजातांनी ही आमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती देण्यात आली यावेळी पत्रकार शितल शिवकर यांना आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली या बैठकीत पत्रकारांचे लक्षणीय उपस्थित होती तसेच मूकनायक सन्मान व पत्रकार दिवस 31 जानेवारी रोजी शेगाव येथे संपन्न होईल अशी माहिती सुद्धा देण्यात आली तसेच आंबेडकर वाईस मीडिया फॉर्म मध्ये कार्यरत असणाऱ्या सदस्य पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे विनंती सुद्धा करण्यात आले माननीय शितलताई शेगोकार यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना या पदाचे मानकरी ठरवले त्याबद्दल आंबेडकरी वाईस मीडियाचे ताईने आभार मानले आणि त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ती अवश्य चांगल्या रीतीने पार पाडतील असे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले…

Previous articleहिमायतनगर ग्रामसेवक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांचा सत्कार….
Next articleजलंब पोलीसांची दमदार कामगीरी माटरगाव येथून चोरीला गेलेली क्रुझर गाडी सह एका आरोपीला घेतले ताब्यात