मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 जानेवारी 2024
हिमायतनगर तालुक्यातील सरसम नगरीचे भुमिपुत्र डाॅ. अमर प्रकाशराव मोतेवार हे मागील एकोणीस वर्षापासुन महागांव जिल्हा यवतमाळ येथे मुळव्याध, भगंदर, फिशर असाध्य वृण .नाकात वाढलेले अतिरीक्त मास इत्यादी आजारांवर अविरतपणे आयुर्वेद क्षार सुत्र क्षेत्रात प्रचार आणी प्रसार रुग्णसेवा करत असुन, त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल नॅचरल वेलनेस पंजाब या संस्थेने ‘ भिषक प्रविण’ पुरस्कार २०२४ ने सन्मानीत केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल वैद्यकीय क्षेत्र, मित्रमंडळ व समाजातील इतर स्तरातुन त्यांचे कोतुक केले जात आहे. डाॅ. अमर मोतेवार हे हुतात्मा जयवंतराव पाटील मा. विद्यालयाचे विद्यार्थी असुन प्रा. अमोल मोतेवार सरांचे छोटे बंधु आहेत. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे हिमायतनगर येथील सर्व मित्रमंडळीने भरभरुन कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.