Home Breaking News डोल्हारी ते पैनगंगा नदी विदर्भाला जोडणारा तिन कि मि रस्ता सार्वजनिक बांधकाम...

डोल्हारी ते पैनगंगा नदी विदर्भाला जोडणारा तिन कि मि रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग केव्हा करणार नागोराव शिंदे 

अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 

हिमायतनगर. डोल्हारी ते पैनगंगा नदी पर्यन्तचा रस्ता हा रस्ता अतिशय खराब झाला असल्याने दिनांक ९ १२. २४. ला सार्वजनिक बांधकाम उपविभाग हिमायतनगर येथे पत्र दिले परंतु आजपर्यंत दखल घेतली नसल्याने आपल्या हिमायतनगर कार्यालयासमोरील धरणे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन कर्ते यांनी सांगितले आहे या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ताविदर्भ मराठवाडा जोडनाणारा एक मेव मार्ग असल्याने ढाणकी उमरखेड फुलसांगी महागाव माहुर जाणार्या वाहणाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते याच रस्त्यावर हिमायतनगर येथे रेल्वे स्टेशन असल्याने विदर्भातील जनतेला अदीलाबाद चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर शिर्डी हैदराबाद मुंबई ला जाण्यासाठी सोईचा आहे हा रस्ता खराब असल्याने उमरखेड आगाराची उमरखेड ढाणकी गाजेंगाव,पळसपुर मार्ग हिमायतनगर बस चालु करण्यासाठी पाहणी करण्यासाठी आली असता खराब रस्ता असल्याने बस चालु झाली नसल्याने येथील ग्रामस्थांनी शंभर दोनशे हजार रुपये जमा करुन या रस्त्यावर मुरुम टाकल्याने उमरखेड आगाराच्या बस सेवा सुरु केली आहे

त्यामुळे माहुरला जाण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला दर्शनासाठी जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने डोल्हारी ते पैनगंगा नदी पर्यन्तचा रस्ता तात्काळ दुरुस्त करून हिमायतनगर पळसपुर डोल्हारी गांजेगाव भागातील जनतेला दिलासा द्यावा २६ जानेवरी पर्यंत रस्त्याचे काम झाले नसल्यास आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन कर्ते नागोराव शिंदे पळसपुरकर पत्रकार यांनी सांगितले आहे

Previous articleसावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त कृषी विभाग बाळापुर यांच्याकडुन अभिवादन ..
Next articleडाॅ. अमर मोतेवार यांना ‘ भिषक प्रविण’ पुरस्कारांने सन्मानीत..