Home Breaking News अरिका बुद्ध विहार येथे विजय स्तंभाला मानवंदना

अरिका बुद्ध विहार येथे विजय स्तंभाला मानवंदना

आजी माजी सैनिकांचा सन्मान ,तर शेकडो महिलांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मोबाईल 8888872854

आयोजक परिवर्तन विचार मंच वाडेगाव
वाडेगाव:- २०७ व्या शौर्य दिनानिमित्त अरिका विहार जयभीम नगर येथे १ जानेवारी बुधवार रोजी विजयास्तभला मान वंदना देण्यात आली.
या निमित्ताने गावातील भीम नगर, जय भीम नगर, पंचशील नगर, सिद्धार्थ नगर, अशोक नगर ,आणि पंचक्रोशीतील उपासक उपासिका उपस्थित होते. प्रामुख्याने सैनिक ,माजी सैनिक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन तथा विजयास्तंभला मानवंदना देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून नायक सुभेदार गुलाबराव उमाळे, दिलीप डोंगरे, रामदास डोंगरे ,कुलदीप डोंगरे, देवदास डोंगरे, मनोज शिरसाठ, रवींद्र सदार ,आनंद तायडे, मनीष सर ,आशिष सुरवाडे, आदी सैनिक उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये नविन लागलेले युवा सैनिकांचा सत्कार करण्यात आला. व त्यांच्या पुढील भविष्यासाठी मंगल कामना व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम मध्ये लाटी काठी स्पर्धा, वर्ष ५नॅशनल चॅम्पियनशिप गोवा २०२४ मध्ये महाराष्ट्रातून क्रॉस पथक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .भीमा कोरेगाव ही युद्ध जातीविरोधी जाती नसून अस्तित्वाची लढाई याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शकांनी सांगितले. कार्यक्रम त्रिशरण व पंचशील घेऊन समारोप करण्यात आला आहे.

Previous articleउमरखेड ढाणकी गांजेगाव पळसपुर मार्गे बस सेवा सुरु….
Next articleजिल्हा परिषद केंद्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये वरुड कबड्डी संघाने केंद्रीय मंडळातून प्रथम क्रमांक पटकावला