अंगद सुरोशे हिमायतनगर
अनेक दिवसापासुन ढाणकी, गांजेगाव पळसपु ppर मार्गे बस सेवा बंद आसल्याने हिमायतनगर ते ढाणकी या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत होता यासाठी प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष इरफान शेख,हरीसिंग चव्हाण,व नागोराव शिंदे पत्रकार,यांनी वारंवार या विषयावर उमरखेड येथील आगार प्रबंधक प्रमोदिनी वि.किनाके यांच्याशी संपर्क करून ढाणकी गांजेगाव पळसपुर मार्गे बस सेवा बस सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले व आगार प्रबंधक प्रमोदिनी वि.किनाके यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले पण सकाळी येणारी परळी वैजनाथ ते अदिलाबाद या रेल्वे साठी व त्याच वेळेत आसलेल्या हरदडा, ब्राम्हणगाव, कोपरा,बोरी,येथुन येणारे प्रवाशी व शाळकरी ,ट्यूशन तसेच काॅलेज च्या मुलांची बस सेवा बंद झाली आसल्याने ती बस चालु करुन देण्यासाठी नागोराव शिंदे पत्रकार यांनी आगार प्रबंधक यांच्याकडे सविस्तर चर्चा केल्याची माहीती दिली आसता लवकरच हरदडा ,ब्राम्हणगांव, कोपरा बोरी , मार्गे बस सेवा सुरु करणार आसल्याचे आगार व्यवस्थापक यांच्या कडुन सकारात्मक उत्तर मिळाल्याचे नागोराव शिंदे यांनी सांगितले