ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674
माटरगाव : महावितरणकडे विद्युत जोडणीकरिता पैसे भरून अद्याप वीजजोडणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, आपणास महावितरणकडून पारंपरिक (विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत तार इत्यादी पद्धतीने) वीज जोडणी न देता सौर कृषि पंप देण्यात येणार आहेत. तरी जे लाभार्थी सौर कृषिपंप घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील खालील लिंकवरून अर्ज करावे. सदर अर्ज सादर करत असताना आपला प्रलंबित वीज जोडणीचा ग्राहक क्रमांक नमूद करावे, त्यामुळे सौर कृषिपंपाच्या रकमेतुन आपल्या कोटेशनची रक्कम वजावट होईल व उर्वरित रक्कम भरणा केल्यानंतर सौर कृषि पंप देण्यात येईल.
जे लाभार्थी सौर कृषिपंप घेण्यास इच्छुक नाहीत त्यांनी भरलेल्या कोटेशनची रक्कम परत मिळणेकरिता पैसे भरलेल्या मूळ पावतीसह अर्ज महावितरणच्या संबंधित उपविभागीय कार्यालयास दाखल करावेत.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषि पंपाकरिता अर्ज दाखल केले आहेत परंतु अद्याप रकमेचा भरणा केला नाही, त्यांनी वरील नमूद लिंक वरून पैसे भरणा करावा म्हणजे त्यांना सौर कृषिपंप तात्काळ पुरविण्यात येतील…