ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674
जलंब….राज्यसभेत अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आंबेडकर, आंबेडकर असा एकेरी भाषेचा उल्लेख करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे. तसेच लोकांनी जर आंबेडकरांचे नाव न घेता जर देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केल्याबद्दल या घटनेचा जलंब ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी
जलंब पोस्टेचे ठाणेदार अमोल सांगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.. एका
सदर निवेदनावर भूमी मुक्ती मोर्चाचे जिल्हा संपर्कप्रमुख भाई गुलाब मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख सुरेश गव्हांदे, उपसरपंच महेश गव्हांदे, माजी पं.स. सदस्य विठ्ठल सोनटक्के ग्राप सदस्य गोपाल मोहे, प्रकाश देवचे यांच्यासह रमेश सरदार, प्रमोद गव्हांदे, विलास गव्हांदे, संदीप विरघट, संजय वानखडे, विनोद रगडे, अतुल हेलोडे, विनोद तायडे, संदीप भोजने, सचिन हेलोडे, शंकर सूर्यवंशी, वैभव मोरे आदी सह असंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत…