अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
उमरखेड शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या व तसेच कोंग्रेस पक्षाच्या शेकडो युवकांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहिर प्रवेश केल्याने येथील पुढे होणार्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार भाजपा चे यवतमाळ जिल्हा समन्वय नितीन भाऊ भुतडा व दत्त दिगांबर वानखेडे (उमरखेड न. प.चे माजी शिक्षण सभापती )यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आसल्याने उमरखेड शहरातील भारतीय जनता पक्षाची ताकत अधिकच वाढल्याचे चित्र दिसुन येते .
उमरखेड शहरातील विकास कामावर मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याने पुढिल होणार्या निवडणुकात याचा फायदा होणार हे मात्र सत्य आहे मतदार संघातील असंख्य कार्तकर्त्यांनी आजपर्यंत काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे . दि.25 डिसेंबर रोजी सकाळी लोट्स निवासस्थानी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा ,दत्तदिगंबर वानखेडे,न.प.माजी शिक्षण सभापती प्रकाश अण्णा दुधेवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपपक्षात प्रवेश केला आहे .
यामध्ये गोपाल कलाने युवा सेना शहराध्यक्ष,महेश ताकतोडे सुरज खोसे,विकास बाभुळकर ,व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग आहे उमरखेड मतदार संघामध्ये भाजपपक्षांच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी शहर ते ग्रामीण भागातील शेवटच्या गावखेड्यापर्यंत आपले संघटन मजबूत करत या मतदार संघाततब्बल पाच वेळा भाजप पक्षांचे आमदार निवडून आणल्यामुळे हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.
२०२४ मध्ये झालेली निवडणूक ही सुद्धा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच झाली आहे . याठिकाणी अखेरच्या टोकावर भाजपचे नवर्निवाचीत आमदार किसनराव वानखेडे यांनी बाजी मारली आहे . नितीन भाऊ भुतडा यांचे काटेकोर नियोजन व कार्यकर्त्यां बद्दल असलेली तळमळ याच भरवश्यावर विश्वास ठेवत आमदार किसनराव वानखेडे यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडली आहे . काॅंग्रेस पक्षामध्ये काही लोकांची एकाधिकारशाही पहाता या पक्षाला गळती लागल्याचे उदाहरण म्हणजे काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश म्हणावा लागेल.