जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 27 डिंसेबर 2024
सामाजिक, शैक्षणिक, कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या प्राचार्य *डॉ. योगिनीताई लक्ष्मण शिंदे ( गोरे )* यांची सावता परिषद महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देतांना सावता परिषद जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रदेश प्रभारी गोरखनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर गोरे, चालक आघाडी तालुका अध्यक्ष विठ्ठल राऊत इत्यादी जण उपस्थित होते.