@ कृषि वार्तापत्र@
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 16 डिसेंबर 2024
हिमायतनगर शहरातील बाजार समितीवर एक वर्षापुर्वी काॅग्रेस पक्षाला सदस्य शेतक-यांनी एकहाती सत्ता देऊन सुध्दा हिमायतनगर बाजार समितीने शेतक-यांच्या हातावर तुरी देण्याचे केले आहे.
लोकप्रिय नेते मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली एक वर्षापुर्वी काॅग्रेस पक्षाला निर्वीवादपणे स्पष्ट बहुमत बहाल केले. तरीही आजतागायत हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांच्या शेतमालांचा लिलाव होत नसल्याने, विदयमान सभापती अतिशय शांत, संयमी, अभ्यासु, ग्रामीण भागातुन आलेले आणी शेतकरीपुत्र असल्याने साहजिकच ग्रामीण, शहरी भागातील बळीराजाच्या प्रश्नांना वाचा फोडलीत हे अपेक्षीत होते. परंतु तसे झाले नाही.
सन- 2008 या वर्षात तत्कालीन शिवसेनेचे विद्यमान सभापती परमेश्वर गोपतवाड यांनी शेतक-यांचा शेतमालाचा लिलाव करण्यांचा प्रयंत्न कसोशीने केला. तो प्रयंत्नात पंधरा दिवस सातत्य दिसले.
👉 पण कुठे माशी शिंकली काय, कुणास ठाऊक शेतक-यांच्या मालाची बिट ( लिलाव) बंद पाडले..
शेजारच्या भोकर तालुक्यात शेतक-यांच्या शेतक-यांची बिट होते. हिमायतनगर तालुक्यात का? होत नाही. हाही यक्षप्रश्न हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांना सतावत आहे.
एकंदरीतच हिमायतनगर बाजार समितीमध्ये शेतक-यांनी पिकविलेल्या सोयाबिन, कापुस, हळद, ज्वारी, गव्हु या शेतमालाचा शासकीय हमीभावाप्रमाणे लिलाव कधी होईल. आणी हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी कधी सुखी होईल. यांचे उत्तर विद्यमान सभापती जनार्दन ताडेवाड यांनी प्रत्रकारपरिषद घेऊन द्यावे..
हिच अपेक्षा….हिमायतनगर तालुक्यातील ज्या शेतक-यांनी आपले सोयाबिन 39000-/ रुपये विकले, कापुस- 6600/- रुपये विकलेल्या शेतक-यांनी हिमायतनगर बाजार समितीचे विद्यमान सभापती जनार्धन भाडेवाड यांना विचारला आहे.