👉 गटविकास अधिकारी यांची माहीती..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 डिसेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यातील महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2024-2025 या वर्षात शेतक-यांनी खोदकाम केलेल्या सिंचन विहीर आणी जनावरांचा गोठा या बाबींचे अनुदान मिळत नसल्याने साप्ताहीक भुमी राजांचे जिल्हा संपादक मारोती अक्कलवाड पाटील आणी तालुका प्रतिनिधी अंगद सुरोशे यांनी पंचायत समितीचे गटविकास जाधव साहेब यांची भेट घेतली असता… त्यांनी सांगितले आदर्श आचारसंहितेमुळे आजपर्यंत पैसे जमा झाले नाहीत. आता तालुक्यातील सर्व लाभ घेतलेल्या लाभार्थयांचे अनुदान येत्या आठदहा दिवसांत जमा होतील. अशी माहिती त्यांनी दिली.
पंचायत समिती महाराष्ट्र ग्रामीण योजनेअंतर्गत सिंचन विहीर, घरकुल, जनावरांचा गोठा आदी बाबीच्या लाभार्थ्यांचे काम प्रगतीपतावर कर्मचारी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे..
एकंदरीतच निवडणुकीनंतर प्रशासन कामाला आहे.