Home Breaking News हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन बांगला देश येथे होत असलेल्या हिंदू हल्याचा...

हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन बांगला देश येथे होत असलेल्या हिंदू हल्याचा जाहीर निषेध…

शेकडो हिंदूंनी हनुमान चालीसा पठण करून काढला न्याय मोर्चा…

अंगद सुरोशे 

हिमायतनगर प्रतिनिधी/- बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू वरील अत्याचारा विरोधात व त्यांच्यावरील अमानुष हिंसाचारा चा जाहीर निषेध करण्यासाठी आज दिनांक 10 डिसेंबर रोजी हिमायतनगर शहरातील सकल हिंदू बांधवांनी सकाळी दहा वाजता व श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समोर सामोहिक हनुमान चालिसा पठण करून शहरातील मुख्य रस्त्याने न्याय मोर्चा काढून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला….

याबाबत सविस्तर वृत्त असे की दि 10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस असल्यामुळे जागतिक मानवाधिकार परिषदेने बांगलादेशातील हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची तात्काळ दखल घ्यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील अत्याचाराच्या विरोधात संयुक्त राष्ट्र व मानवाधिकार परिषद यांनी तात्काळ लक्ष देऊन बांगलादेशातील हिंदू मंदिर, हिंदू संस्थान हे असुरक्षित असून दररोज तेथील हिंदूवर भ्याड हल्ले होत आहेत या बाबीकडे भारत सरकार जागतिक पातळीवर बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न करत आहे जगातील कुठल्याही हिंदू बांधवांवर अन्याय होत असेल तर विरोधात सकल हिंदू समाजाकडून तीव्र निषेध आणि विरोध होणे आवश्यक आहे त्यामुळे हिमायतनगर येथील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने आज दि 10 डिसेंबर रोजी बांगलादेशी हिंदू साठी हिमायतनगर शहरातील सकल हिंदू समाज बांधवांनी सर्व बाजार पेठ सकाळी 12 वाजे पर्यंत कडकडीत बंद ठेवून शहरातील मुख्य रस्त्याने शेकडो हिंदू बांधवांनी न्याय मोर्चा काढत शहरातील श्री परमेश्वर मंदिर समोर सामूहिक हनुमान चालीसा पठण करून बांगलादेशातील हिंदूंना तात्काळ न्याय मिळवून द्यावा यासाठी न्याय मोर्चा काढून या मोर्चाची संयुक्त राष्ट्राने तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती करत बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चौख पोलीस बंदोबस्त लावून हा मोर्चा शांततेत संपन्न केला या मोर्चामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेसह सकल हिंदू समाज बांधवांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते….

Previous articleस्वता:चे अस्तीत्व स्वत: निर्माण करा
Next articleदिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी आधिकारी संघटना आझाद मैदान येथे महावितरण मधील अन्याय विरोधात आमरण उपोषण.