हिमायतनगर ते बोरगडी रोड करणार्यां गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका …..माधव काईतवाड सामाजिक कार्यकर्ता
हिमायतनगर/ प्रतिनीधी
हिमायतनगर ते श्रीक्षेत्र बोरगडी येथील रोड चे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा सिमा दुरुस्ती योजने अंतर्गत 2024 या वर्षात हिमायतनगर ते बोरगडी पर्यंत अंदाजे 6 कि.मी चे डांबरीकरण चे काम चालू असुन सदर कामाचे शासकीय गुत्तेदार एस.एस.पळशिकर हे आहेत परंतु हे गुत्तेदार अंदाज पत्रकाप्रमाणे काम करित नसुन कामात साईड ब्रम्ह मध्ये माती मिश्रित मुरुम टाकत आहे तसेच कामावर जुना रस्ता खोदुन तेच मटेरीयल नवीन रस्त्याच्या बांधकामाकरिता वापर करित आहे काम खुपच संथ गतीने होत आसल्याने वाहनाचे आपघात होत आसल्याचे तक्रारीतुन बोलल्या जाता आहे तरी उपविभागीय अधिकारी व बांधकाम विभागाने वेळीच चौकशी करुन आश्या मुजोर व स्वार्थी गुत्तेदाराला कोणाचा पाठिंबा आहे त्यांच्यावर ही कार्यवाही करुन गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका आशी मागणी श्री क्षेत्र बोरगडी येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भैरवाड व माधव काईतवाड यांनी केली आहे