जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 डिसेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतक-यांनी खोदलेल्या सिंचन विहीरीचे बिलं गेल्या एप्रिल महिन्यात खोदुन सुध्दा आजतागायत एकही बिल मिळाले नाही. आदर्श आचारसंहिता संपली तरी सिंचन विहीरीच्या बिले काढण्याला गती येत नाही. हि शोकांतिका आहे
कोरडवाहु शेती परवडत नाही म्हणुन शेतात सिंचनाची सोय व्हावी. या उदात्त हेतुने शेतक-यांनी इतरांचे पैसे घेऊन सिंचन विहीर खोदली. बांधकामही केले.सुदैवाने विहीरीला पाणीही भरपुर लागले खरीप हंगाम संपवुन रब्बी हंगाम आला तरी एकही विहीरीचे बिलं मिळत नाही. याकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन शेतक-यांना सहकार्य करण्याची मागणी होत आहे.