Home Breaking News आता जनतेचा 5 वर्ष सालगडी म्हणून काम करणार 

आता जनतेचा 5 वर्ष सालगडी म्हणून काम करणार 

श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम यांचा सत्कार संपन्न….

मतदारांच्या विश्वासाला 5 वर्षात कधी तडा जाऊ देणार नाही ….आमदार बाबुराव कोहळीकर 

अंगद सुरोशे 

हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मला भरघोष मतदान देऊन विजयी केले त्याबद्दल मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला व लाडक्या बहिणींच्या विश्वासाचे फलित म्हणजे मी माझा विजय हिमायतनगर शहरातील जनतेसाठी वाहून टाकतो व मी पाच वर्षात कधीच तुमच्या विश्वासाला तडाजाऊ देणार नाही असे सांगत दिनांक 29 नोव्हेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून हदगाव हिमायतनगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार कोहळीकर हे प्रथमच हिमायतनगर शहरात आल्या मुळे त्यांचा श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणले की आता मी मतदार संघातील जनतेचा पाच वर्ष सालगडी म्हणून काम करणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले…

यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी चे सर्व संचालक,ज्येष्ठ नागरिक,मतदार , कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleलोकनेत्यांसाठी चाहते गहिवरले!
Next articleआरोग्य, पाणी, विज आणी शेतक-यांची कामे प्राधान्याने करण्याचा नवनिर्वाचित आमदारांचा निर्धार.