मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दि. २८नोव्हेंबर 2024
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या१३४ व्या स्मृतीदिनानिमित्त सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज सर्वांनी अभिवादन केले.
शहरातील आय.टी.आय.येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिजोती सावित्रीमाई फुले यांच्या मुख्य पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून सावता परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सावता परिषदेचे सर्व पदाधिकारी व विविध पक्षातील सर्व सेल चे पदाधिकारी इतर समाज बांधव यावेळी उपस्थित होते.