Home Breaking News आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडत नेत्यांच्या सभा गाजत आहेत.

आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडत नेत्यांच्या सभा गाजत आहेत.

संगित भजनातुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न.

जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालु आहे. प्रचार 18 तारखेला सायंकाळी संपणार आहे. महायुती आणी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ष्ट्र स्वराज्य पक्ष, समाजवादी पक्ष, या पक्षाच्या अनेक नेते मंडळींनी आपआपल्या खास शैलीत आपल्या अधिकृत उमेदवारांचा प्रसारसभा घेत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत मनोरंजनात्मक नेत्यांचे भाषणे मतदारांची चांगलीच करमणुक करत आहेत.

संगित भजनातुन उमेदवारांचे गुणगान गाऊन मतदारांना आकर्षित करत आहे. संगीत भजनातुन सुमधुर, सुदंर स्वरात गायक आपले गितातुन उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

शेतक-यांचा मुदा, महागाई, शेतमालाला भाव नाही, आरोग्य, शिक्षण, सिंचन सुविधा या विषयावर कोणीही ठाम बोलायला तयार नाही. कोणी कितीही प्रचार जोरात केला तरी मतदारराजा आता हुशार झाला आहे. आपले मत कुण्या उमेदवारांच्या पारड्यात टाकणार येत्या 23 नोव्हेंबर रोजीच कळणार आहे.

Previous articleभटके विमुक्त ओबीसीनी प्रस्थापितांची मक्तेदारी विधानसभा निवडणुकीत संपवावी…