👉 शेतक-यांचा महावितरणला आर्त टाहो.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 15 नोव्हेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यातील आंदेगांव सबस्टेशन वरुन पार्डी फीडरवर असलेल्या पैलवाड डीपीची लाईट दर पाच-पाच मिनीटाला जात आहे. शेतकरी लाईनमेनला साहेब लाईट पाच पाच मिनीटाला जात आहे हो…..काहीतरी करा साहेब असा आर्त टाहो शेतकरी फोडीत आहेत. रब्बी हंगामातील गहु, हरभरा , हळद हि पिके पाण्याअभावी अक्ष:रक्षा वाळुन जात आहेत. शेतक-यांच्या डोळ्यात पाणी पाहतांना मन हेलावुन जाते.
महावितरण कंपनी हि शेतक-याच्या मुळावर घाव घालते आहे का? असा प्रश्न सवना येथील शेतकरी विचारत आहेत. पार्डी फिडरवरुन वाशी, एकघरीच्या १९ डीपी जोडल्यामुळे हा प्राॅबलेम येतो आहे. असे पार्डी सजाचे लाईनमेन आडे यांनी सांगितले आहे. उपकार्यकारी अभियंता पवन भडंगे हे सध्या सुटीवर असल्याचे समजते आहे. महावितरण कंपनीने हा लाईटचा प्रश्न येत्या दोन दिवसांत निपटारा करावा. अन्यथा महावितरण कार्यालयावर उग्र आंदोलन करण्यात येईल.